अंत्योदय अंतर्गत म्हापण येथे लाभार्थ्यांना साडी वाटप शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.१५-: म्हापण येथील धान्य दुकान येथे अंत्योदय कार्डधारक महिला लाभार्थी यांना शासनामार्फत मोफत साडी वाटपचा शुभारंभ म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी म्हापण उपसरपंच श्रीकृष्ण उर्फ लाला ठाकूर, ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर, धान्य दुकानचे गुरुनाथ मार्गी, रविंद्र परब ,माजी जिप आरोग्य सभापती विकास गवंडे,सौ, चव्हाण,लाभार्थी मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.म्हापण येथे अंत्योदयचे एकूण १२१लाभार्थी असून या साडी वाटपचा लाभ या सर्व महिला लाभार्थी यांना होणार आहे.

You cannot copy content of this page