Headlines

परुळे, कुसेवाडा येथे आरोग्य तपासणी, चष्मे वाटप शिबिर संपन्न…

ऍड अभय देसाई चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत यांचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.१५-: परुळे कुशेवाडा ग्रा.पं. येथे अँड अभय कुमार देसाई, चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत व ग्रामपंचायतीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य नेत्र, रक्त तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उप सरपंच महादेव सापळे, अविनाश देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, डॉ उमाकांत सामंत, नुपूर
सामंत ,अमेय देसाई, प्रकाश राणे यां सह अन्य मान्यवर
उपस्थित होते.
यावेळी ग्लोबल फाउंडेशन
पिंगुळी यांच्या मार्फत नेत्रतपासणी, कोकण
कला व शिक्षण संस्था यांच्यामार्फत रक्त
तपासणी व आरोग्य तपासणी डॉ.प्रणव प्रभु यांच्या मार्फत करण्यात आली. यावेळी
प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.तसेच
कुशेवाडा येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page