जुनी पेन्शन हक्क संघटनेची जिल्हा कार्यकारिणी स्थापन…

अध्यक्ष पदी श्री. राजू वजराटकर तर सचिव पदी श्री. संजय चव्हाण यांची निवड_

*💫ओरोस दि.२०-:* ओरोस येथे प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी श्री. राजू उर्फ शंकर वजराटकर, कार्याध्यक्ष पदी श्री. तुषार पवार तसेच सचिव पदी श्री. संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर श्री. प्रवीण पाताडे हे संघटनेचे राज्य प्रतिनिधी तथा विश्वस्त पदी कायम असल्याचे राज्यकार्यकारिणीच्या वतीने जाहीर केले. आज संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हाभरातून जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिक्षक आले होते. नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून जिल्हा कार्यकारिणीत सदस्य निवडण्यात आले. तत्पूर्वी संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष श्री. प्रविण पाताडे सरांनी मागील कालावधीत केलेल्या कार्याची, जिल्हा तसेच राज्यस्तरीय आंदोलने, झालेले खर्च इ. बाबतीत आढावा वाचन केले. पुढे त्यांनी एक सदस्य- एक पद या न्यायाने नवीन फळी तयार करावी लागणार असे नमूद केले. सर्वांचा आग्रह असला तरी आपण राज्यस्तरावर कार्यरत असल्यामुळे जिल्हा स्तरावर नवीन कार्यकुशल नेतृत्वाला संधी द्यावी. यापुढे लागेल ते सहकार्य, मार्गदर्शन करू असे सांगून जिल्हा नूतन कार्यकारिणी स्थापन करावी असे सुचवले. यावेळी राज्य संपर्क प्रमुख श्री. चिदानंद कोळी सर उपस्थित होते. तर श्री. योगेश देशमुख यांची राज्यसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी राज्यकार्यकारिणीला अपेक्षित असे आदर्श जिल्हा संघटन गठीत करण्यात आले. याचे झूम मीटिंगद्वारे सहक्षेपण करण्यात आले. यात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटिल तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अमोल माने ह्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. अखेरीस नूतन कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. शेवटी सर्व सभासद, नूतन कार्यकारिणी तसेच राज्य संघटन पदाधिकाऱ्यांचे नूतन सचिव श्री. संजय चव्हाण यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page