मळगाव येथे गणेश जयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: मळगाव येथील कशाळीकर गणेश मंदिर व सुधीर भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.


यनिमित्त वरील दोन्ही ठिकाणी अभिषेक, नित्यपूजा, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. कशाळीकर गणेश मंदिरात सायंकाळी लहान मुलांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल या मुलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर भजन सादर करण्यात आले. सुधीर भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त सकाळी सत्यविनायक महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी महिलांच्या फुगड्या, ग्रामस्थांची भजने आदी कार्यक्रम पार पडले. या दोन्ही ठिकाणच्या गणेश जयंती उत्सवाला भाविकांनी उपस्थिती दर्शवत या कार्यक्रमांचा तसेच तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page