मनसेच्या बैठकांना स्वतःच्या गावातून भाडोत्री आणावे लागतात हेच संदीप दळवींचे कार्य…

मंदार नाईक: उपरकरांवर टीका करणाऱ्या दळवींचा जिल्ह्यात योगदान काय..?

⚡सावंतवाडी ता.१२-: स्वतःच्या आरोस गावात मनसेच्या शाखेच्या सदस्यांनी राजीनामा देऊन शाखा पूर्णपणे बरखास्त केली त्या गावात पैसे देऊन भाडोत्री माणसं बैठकांना आणावे लागतात हेच संदीप दळवींचं आजपर्यंत पक्षाचं कार्य अशी टीका उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी आज येथे केली आहे.दरम्यान जिल्ह्यात उपरकर यांनी लावलेला बॅनर वरून टीका करणाऱ्या संदीप दळवींचं जिल्ह्यात योगदान काय असावा श्री नाईक यांनी यावेळी उपस्थित केला.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की. संदीप दळवी यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा अन्यथा त्यांचा बारा वाजून असा इशाराही उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी दिला आहे. स्वतःचा फोटो वापरला नाही म्हणून मनसैनिकांशी हुज्जत घालणाऱ्या दळवी यांचे मनसेच्या वाढीसाठी योगदान काय ..?असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला असून सिंधुदुर्गातील जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनसे बरखास्त करण्याचे काम यांनीच केला आहे. असा आरोपी श्री.नाईक यांनी यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page