उपरकारांना अजुन दुसऱ्या पक्षांचे दरवाजे का झिजवावे लागतात…?

विष्णू वसकर: व्यवसायकांकडून पैसे घेऊन घर चालवणाऱ्या अभय देसाई यांनी मनसे नेत्यांवर टीका करणे हास्यास्पद..

⚡बांदा ता.१२-: पक्षाचा कार्यक्रम आहे असे सांगून व्यवसायीकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या घरात किराणा भरणाऱ्यांनी मनसेचे जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्या बद्दल बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. त्यांनी हि टिका थांबवावी, असे आव्हान मनसेचे बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर यांनी दिले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हेच या कंपूचे कामच आहे, निवेदने देत फिरायचे आणि त्यातून कमाई करायची हेच यांचे उद्योग आहेत. राहिला प्रश्न 80 टक्के मनसैनिकांचा उपकार यांना पाठिंबा आहे मग उपरकारांना अजून दुसऱ्या पक्षांचे दरवाजे का झिजवावे लागत आहेत? अद्याप त्यांनी दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश का केला नाही याचे उत्तर अभय देसाई यांनी द्यावे. नाही तर आपली लायकी काय आहे ते बघून गप्प बसावे. लवकरच त्यांच्या समर्थकांना राजकीय संन्यास घ्यावा लागणार आहे. मनसे यांची चालू असलेली आरटीआयची दुकाने बंद करणार हे नक्की. असे निवेदनात वसकर यांनी म्हटले आहे.

अभय देसाई यांनी नुकतीच मनसेचे सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्यावर टीका केली होती. या बाबत वसकर यांनी निवेदन देऊन त्यांचा समाचार घेतला आहे.

You cannot copy content of this page