टायगर ग्रुप संघ उपविजेता ; नवयुवक कला क्रिडा मंडळाचे सलग सहाव्या वर्षी आयोजन ..
⚡सावंतवाडी ता.११-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रिडा मंडळ यांच्या वतीने सलग सहाव्या वर्षी घेण्यात आलेल्या सोनुर्ली प्रिमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत यावर्षी कळमेश्वर स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले तर टायगर ग्रुप संघाला उपविजेेपदावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांना सोनुर्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रमुख मानकरी रमेश गावकर यांच्या हस्ते उपस्थितीत मान्यवरांच्या समवेत चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
सोनोली नवयुवक कला क्रीडा मंडळ गेली सहा वर्ष सातत्याने सोनुर्ली प्रीमियर लीग यासारख्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे केवळ क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर अन्य सामाजिक कार्यातही या मंडळाचा सहभाग आहे त्यामुळे या मंडळाच्या होणाऱ्या दरवर्षीच्या प्रीमियर लीगला एक वेगळेच महत्त्व असते यावर्षीही मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली ही स्पर्धा क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या उपस्थितीत पार पडली.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघाने सहभाग दर्शविला होता यामध्ये भवानी स्पोर्ट मालक सत्यवान हिराप, गिरोबा स्पोर्ट मालक दिगंबर नाईक, रिया ईलेव्हन मालक बाबी गावकर ईसवटी स्पोर्ट्स मालक भूषण ओटवणेकर कमळेश्वर स्पोर्ट्स मालक विनायक गावडे तर टायगर ग्रुप मालक विठ्ठल नाईक यांनी लीगमध्ये संघ घेतले होते. या स्पर्धेच्या संपूर्ण मॅचेस् मध्ये सहाही संघाच्या खेळाडूंनी आपले विशेष प्रयत्न करत स्पर्धेत रंगत आणले होती. मात्र अंतिम सामन्यांमध्ये कमळेश्वर स्पोर्ट्स व टायगर ग्रुप या दोन संघाने प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना कमळेश्वर स्पोर्ट्स संघाने पाच षटकांमध्ये 66 धावांचे उद्दिष्ट टायगर ग्रुप संघासमोर ठेवले होते कमळेश्वर स्पोर्टस संघाकडून मनीष मयेकर व अनुष पार्सेकर तसेच राज सोनुर्लेकर यांनी चांगली फटकेबाजी करत ही धावसंख्या उभारली होती. 67 धावांचा पाठलाग करताना टायगर ग्रुप संघाने सुरुवातीला चांगली धावगती ठेवली होती परंतु कमळेश्वर संघाच्या अचूक गोलंदाजीवर टायगर ग्रुप संघाचा आयकॉन खेळाडू स्वस्तात बाद झाला त्यानंतर शुभम नाईक व अजय पार्सेकर यांनी किल्ला लढवला परंतु हा शेवटच्या षटकात हा सामना कमळेश्वर स्पोर्ट्स संघाने आपल्या बाजूने वळऊन सात धावांनी विजय संपादन केला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून टायगर ग्रुप चा शुभम नाईक तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रशांत मुळीक ठरला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून रुपक मातोंडकर व देवीदास परब(मांतोड) तर समालोचक म्हणून काका सामंत (होडावडा) संदिप दळवी,राहुल मांजरेकर (न्हावेली) यांनी काम पाहीले. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
