पिंगुळी गावात नागरिकांनी राबविली कचरा साफसफाई मोहीम…

⚡कुडाळ ता.११-: पिंगुळी गावातील कचऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन आज प्राथमिक स्वरूपात काही नागरिकांनी एकत्र येऊन काही भागाची साफसफाई केली. आपल्या गावातील या कचरा साफसफाई मोहिमेस ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाल्याने ही मोहीम यापुढे देखील एखादा नियोजित दिवस ठरवून राबविण्यात येणार आहे.
आजच्या प्रतिसादाप्रमाणे भविष्यात देखील पिंगुळी गावाचे ग्रामस्थ म्हणून उपस्थिती दाखवून आपला गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत दीपक गावडे, बाबल गावडे, अमित तेंडोलकर, अजय आकेरकर, सतीश मांडये, राज वारंग यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page