परशुराम उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू…

विनोद सांडव: संघटनेसाठी व कार्यकर्त्यांसाठी तन मन धन अर्पण करत नेहमीच परशुराम उपरकर
कार्यरत राहिले..

⚡मालवण ता.०९-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्षे काम करत आहोत. मनसेच्या राजीनाम्यानंतर आमचे नेते परशुराम उपरकर जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम राहू, अशी भूमिका मनसेचे माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी स्पष्ट केली आहे.

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते पुढील राजकीय दिशा कुडाळ येथील १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यातुन स्पष्ट करणार आहे. या पार्श्वभूमीवर विनोद सांडव यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.

परशुराम उपरकर हे संघटनेसाठी व कार्यकर्त्यांसाठी तन मन धन अर्पण करत नेहमीच कार्यरत राहिले. कार्यकर्त्याला बळ देतानाच नेहमी कार्यकर्त्यांसोबत उपरकर राहिले. पारदर्शक पद्धतीने जिल्ह्यात विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका राहिली. आगामी काळात कार्यकर्त्यांच्या बाजूने विचार करत तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्याससोबत मालवण तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. कुडाळ येथे १८ रोजी होणाऱ्या मेळाव्यात मालवण तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहितीही विनोद सांडव यांनी दिली.

You cannot copy content of this page