साजरा केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस
*💫सावंतवाडी दि.२०-:* शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक शेटकर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला असून, त्यानी आपल्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना ब्रेंडवे छत चे वरषापूर्वीची केल आहे. सद्या वातावरणात तापमान वाढले असून, पोलिसांना उन्हात उभे राहावे लागत असल्याने त्यांना ही अनोखी भेटवस्तू त्यानी दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या हस्ते फीत कापून या छताचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब,नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक, मोहिनी मडगावकर , बंटी पुरोहित, बळवंत कुडतरकर पोलीस प्रवीण सापळे पोलिस सुनील नाईक आदी उपस्थित होते.
