मनसेचा रविवारी सावंतवाडीत मेळावा…

अँड अनिल केसरकर: शेकडो कार्यकर्त्यांचा होणार मनसेत प्रवेश..

⚡सावंतवाडी ता.०८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आले.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश होणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी आज येथे दिली.

दरम्यान यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस व जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे हे उपस्थित राहण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आहेत तरी सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ही श्री केसरकर यांनी यावेळी केले आहे.

You cannot copy content of this page