शहरांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी…

सुरेश भोगटे:तात्काळ अडचणी दूर करा;भोगटेंची मागणी..

⚡सावंतवाडी ता.०८-: शहरांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे नागरिक तसेच व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे एकूणच याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वीस वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारात विद्युत प्रवाह अविरत सुरू राहण्यासाठी तांत्रिक तात्काळ अडचणी दूर करा अशी मागणी केली.

सावंतवाडी शहरांमध्ये अलीकडे प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत सकाळच्या वेळी तसेच दुपारच्या वेळी यामध्ये सातत्य असते एकूणच यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याच प्रश्नावर माजी नगरसेवक श्री भोगटे यांनी वीस वितरण चे उपविभागीय अधिकारी श्री खोब्रागडे यांची भेट घेऊन जा विचारला यावेळी शहरातील झाडांच्या फांद्या तसेच अन्य कारणामुळे विद्युत प्रवाह खंडित होत आहे याबाबत वीज वितरण कडून कार्यवाही सुरू आहे असे सांगितले परंतु तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा अशी मागणी केली दरम्यान यापुढे असे प्रकार होणार नाही अशी ग्वाही श्री खोब्रागडे यांनी दिली.

You cannot copy content of this page