जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या झालेल्या यशस्वी सभेमुळे केसरकर हतबल….

रुपेश राऊळ: कार्यक्रमांना खर्च न करणारे केसरकर मंत्री पदासाठी कोट्यावादी कसे देऊ शकतात..

⚡सावंतवाडी ता.०९-: उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीत आणि जिल्ह्यात झालेल्या सभा यशस्वी झाल्याने मंत्री दीपक केसरकर हे हतबल झाले असून स्वतःचे अपयश लपवण्यासाठी ते उलट सुलट आरोप करत आहेत मुळात मंत्री पद मिळाल्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमांना खर्च न करणारे केसरकर मंत्री पदासाठी कोट्यावधी देऊ शकतात हे आश्चर्य वाटते अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.ते श्री.राऊळ आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलतान म्हणाले की शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या पक्षप्रमुखांवर व पक्षावर खोटे आरोप केले आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवावे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे कोकणात वाढली. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा यशस्वी झाल्यानं केसरकर बिथरले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला लोक जमत नाहीत त्यामुळे ते घाबरले आहेत. म्हणून, आजवर सभा घेऊ शकले नाहीत. एवढंच काय तर महासंस्कृती महोत्सवाला सुद्धा त्यांना लोक जमवता आली नाही. आपल अपयश झाकण्यासाठी ते आरोप करत आहे. एवढेच स्वाभिमानी होते तर तेव्हाच पक्षातून का नाही बाहेर पडले? असा सवाल उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला.

दरम्यान, दोन कोटी खर्चून सावंतवाडीत होत असलेल्या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. याकडे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच लक्ष लेधणार असल्याचं ते म्हणाले.महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सावंतवाडी येथे होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाकडे लोकांनी पुर्णपणे पाठ फिरवली आहे. जेवढी लोक उद्धव ठाकरेंच्या सभेला जमली होती तेवढी सुद्धा लोक शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या महोत्सवाच्या शुभारंभाला जमवू शकले नाहीत. २ कोटी खर्च करुन केलेल्या या महोत्सवाकडे लोकांनी पुर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कोट्यावधी खर्च करुन होत असलेल्या या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाची चौकशी करण्याची मागणी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.

याप्रसंगी चंद्रकांत कासार, अशोक परब , संदीप माळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page