शिक्षक भरतीत डीएड बेरोजगारांना न्याय द्या…

राजन तेली: डीएड संघर्ष समितीसह सीईओ देशमुख यांची घेतली भेट.

सिंधुदुर्गनगरी ता ७
डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उमेदवारांना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन शिक्षक पदी नियुक्ती द्याव्यात. या मागणीसाठी आज माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज अध्यक्ष विजय फाले यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेतली.व त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
या निवेदनातून त्यांनी डीएड बेरोजगारावर होणाऱ्या अन्यायाबाबत लक्ष वेधले, तर एका बाजूने पोल्टल भरती आणि दुसऱ्या बाजूने परिपत्रकानुसार नियुक्त्या यामुळे डीएड बेरोजगार उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. न्यायासाठी उपोषणास बसलेल्या व गेली अनेक वर्ष नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या डी एड बेरोजगारांवर अन्याय होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीला तात्पुरत्या शिक्षक नियुक्तीचे अधिकार दिल्याने आपल्या मर्जीतील उमेदवारांना घुसवण्याचा प्रयत्न होणार आहे. तरी डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उपोषणकर्त्या ३०० उमेदवारांना या भरतीत प्राधान्याने सामावून घ्यावे .त्यांना तालुका निहाय यादी प्रमाणे आपल्या स्तरावरून शाळा निश्चित करून द्यावी. तसेच परिपत्रकात डीएड व बीएड असा उल्लेख असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परिपत्रकातून बीएड चा उल्लेख वगळावा. तसेच सद्यस्थितित कार्यरत असलेले (डीएड पदवी धारण न केलेले) उमेदवार यांना सामावून न घेता डीएड झालेल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्याने संधी मिळावी. पटसंख्येची अट शिथिल करून रिक्त असलेल्या सर्व शाळातील जागा भराव्यात. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला प्राधान्यने नियुक्ती देणे शाळा व्यवस्थापन समितीला बंधनकारक करावे. तसेच तात्पुरत्या नियुत्या बाबत उमेदवारांमध्ये झालेला संभ्रम दूर करावा. अशी मागणी यावेळी डीएड उमेदवारा नी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page