परमिशन घेऊन लावलेले ठाकरेंचे बॅनर काढणे हे दबावापोटी की प्रशासनाची पोटदुखी…

रुपेश राऊळ ; बॅनर पुन्हा न लागल्यास पालिकेसमोर आंदोलन..

⚡सावंतवाडी ता.०६-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे रितसर परमिशन घेऊन मुदत असताना देखील आमचे बॅनर आज काढण्यात आले आहेत. परंतु अशाप्रकारे बॅनर काढणं ही कोणाच्या दबावापोटी की प्रशासनाची पोटदुखी झाली असं सवाल ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज उपस्थित केला.दरम्यान मुदत असताना जर हे बॅनर आजच्या दिवसात न लागल्यास तर उद्या नगरपालिकेश समोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील श्री.रुपेश राऊळ यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिला आहे.

याबाबत तालुका प्रमुख रुपेश राऊळ पुढे बोलताना म्हणाले की प्रशासनाचा कार्यक्रम असल्याने आम्ही तुमचे बॅनर काढते असे आम्हाला कळवले होते परंतु आम्ही त्यांना मोजके बॅनर काढून काही बॅनर मुदत वाढ नुसार ठेवावे असे सांगितले असताना देखील आमच सर्व बॅनर काढण्यात आले आहेत त्यामुळे प्रशासनाने त्वरित ते बॅनर लावावे अन्यथा उद्या नगरपालिकेसमोर आमचा आंदोलन कोणत्या परिसर होणार असाही रुपेश राऊळ यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर,अशोक परब ,आबा सावंत, प्रशांत भोगटे,फिलीप रोडरीक, संदेश केरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page