केसरकर स्वतःच्या हिमतीवर निवडून आले असतील तर येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा…

रूपेश राऊळ- कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे येणाऱ्या निवडणुकीत जनता ठरवणार..

सावंतवाडी ता.०६-: मंत्री केसरकर हे जर स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले असतील तर येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा मग पाहू जनतेच्या आशीर्वादाने की शिवसैनिकांच्या जीवावर की तुमच्या कार्यकर्तुत्वावर निवडून आलात हे दिसेलच असा पलटवार ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एबी फॉर्म दिल्यानेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला दिवस रात्री काम करून शिवसेनेच्या आशीर्वादाने आपण निवडून आलात त्याला मीच देखील साक्षीदार आहे असेही राऊळ यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राऊळ पुढे बोलतान म्हणाले की मंत्री दीपक केसरकारांनी कोण खरं आहे हे जनताच येणाऱ्या काळात ठरवणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात दिसेलच जनता कोणासोबत आहे. त्यामुळे आम्ही देखील निवडणुकीची वाट पाहत आहोत असा टोला देखील राऊळ यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page