⚡बांदा ता.०६-:
बांदा उपसरपंच निवडणुकीसाठी भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री सावंत हे उपसरपंचपदी विराजमान होणार आहेत. दुपारी ३ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. उपसरपंच जावेद खतीब यांनी पक्षीय धोरणनुसार राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.
आज उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी नामनिर्देशन दाखल करताना सत्ताधारी भाजपच्या वतीने श्री सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. बांदा ग्रामपंचायतमध्ये भाजपची गेली ३० वर्षे निर्विवाद एकहाती सत्ता आहे. भाजपचे बारा सदस्य असून शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे उपसरपंच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. विरोधकांकाकडून अर्ज दाखल न झाल्याने श्री सावंत यांची बिनविरोध निवड होणार आहे. केवळ औपचारिकता शिल्लक असून दुपारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
बांदा उपसरपंच निवडणुकीसाठी भापजचे बाळु सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज…
