जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला मोठा प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधी
बांदेश्वर फिटनेस क्लब आयोजित व कोकणसिंधू पाॅवरलिफ्टींग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


स्पर्धेचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भाजप बांदा शहर अध्यक्ष नरसिंह ऊर्फ बाबा काणेकर, कोकणसिंधू पाॅवरलिफ्टींग असोसिएशनचे सचिव संजय साटम, उपसचिव गणेश वायंगणकर, बीएफसीचे मालक संदेश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
बांदा शहरात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक वजनी गटातून प्रथम तीन नंबर काढण्यात आले व या संपूर्ण स्पर्धेत मुलांच्या गटातून तौशिक शेख याने स्ट्राँग मॅन हा किताब पटकावला, तर मुलींच्या गटात सायली घारे यांनी स्ट्राँग वुमन हा किताब पटकावला. वेगवेगळ्या वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत 150 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवसो परब यांनी केले तर आभार संदेश सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page