आ भास्कर जाधव यांना शेवटची वार्निंग….

निलेश राणे: माझा पराभव झाला तरी चालेल पण योग्य बंदोबस्त केला जाईल..

⚡ओरोस ता.०५-: राजकीय व्यासपीठावरून टीका करताना मर्यादेत राहून बोलायचे असते. परंतु व्यक्तिगत टीका अत्यंत खालच्या पातळीवर उतरून करणे योग्य नसते. परंतु काल कणकवली येथे टीका करताना आ भास्कर जाधव यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांना ही शेवटची वार्निंग आहे. यापुढे टीका केल्यास वॉर्मिग न देता किंवा पत्रकार परिषद घेवून प्रतीआरोप न करता बंदोबस्त केला जाईल. त्यामुळे माझा आणखी एकदा पराभव झाला तरी तो चालेल, असा इशारा भाजप युवा नेते निलेश राणे यांनी दिला आहे.
उबाठा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी जिल्हा दौरा केला. सावंतवाडी, कुडाळ येथे कॉर्नर सभा घेतल्या. तर कणकवली येथे त्यांची जाहीर सभा झाली.

यावेळी आ जाधव यांनी राणे कुटुंबावर व्यक्तिगत आणि कौटुंबिक टीका केली. यावेळी त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना निलेश राणे यांनी यापूर्वी आम्ही केवळ एकवेळ उध्दव ठाकरे यांच्यावर स्तर सोडून टीका केली होती. परंतु त्यावेळी संजय राऊत यांनी पातळी सोडून आमच्यावर टीका केल्याने ही टीका केली होती. अन्यथा आम्ही मर्यादा सोडली नव्हती. परंतु काल भास्कर जाधव यांनी कौटुंबिक पातळीवर हिन दर्जाची टीका केली आहे. त्याचे उत्तर गृहागर येथे १६ फेब्रुवारी रोजी सभा घेवून त्यांना देणार आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर भास्कर जाधव यांनी यापूर्वी ठाकरे कुटुंबावर टीका केलेल्याचा व्हिडिओ सादर करीत आता जाधव राजकारणातून सन्यास घेतील का ? असा प्रश्न केला. यावेळी निलेश राणे यांनीही आ जाधव आणि उध्दव ठाकरे यांच्यावर कौटुंबिक पातळीवर खालच्या पातळीवर जावून टीका केली.

You cannot copy content of this page