सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालयाला माऊली मित्र मंडळाची देणगी…

⚡कणकवली ता.०५-: संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या “माऊली मित्र मंडळाशी संलग्न असलेल्या ” शालेय मित्र मंडळाचे” वतीने सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालय शाळा नंबर ३ला देणगी स्वरुपात रक्कम देण्यात आली.

शालेय मित्र मंडळाचे अध्यक्ष व माऊली मित्र मंडळ, संलग्न मित्र मंडळांचे सल्लागार संजय मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय मित्र मंडळाच्या पदाधिकारी सौ. संगीता वाळके (डेगवेकर), दया वाळके (बोभाटे) यांच्याहस्ते शाळा नंबर ३ च्या मुख्याध्यापिका श्रीमती करंबेळकर व शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत पुस्तकालयातील पुस्तके जतन करून ठेवण्यासाठी कपाट खरेदी करिता देणगी स्वरुपात रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.
बाबा भालचंद्र महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथीच्या वेळी पुस्तकालयासाठी माऊली मित्र मंडळाचे वतीने “पुस्तके देण्यात आली होती” त्यावेळी शाळेच्या वतीने पुस्तके ठेवण्यासाठी कपाटाची आवश्यकता आहे, असे म्हटले होते, आणि म्हणूनच १९७६/७७ च्या माजी विद्यार्थी वर्गाने शाळेला भेट दिली, आणि देणगी स्वरुपात रक्कम सुपूर्द केली, तसेच याही पुढे जेव्हा जेव्हा आमच्या शाळेच्या आवश्यकतेनुसार आम्ही जरुर मदत करू,तसेच या शाळेतील माजी विद्यार्थी वर्गाने भेटी देऊन, आवश्यक ती मदत करावी, शाळेच्या परिसरात विज्ञान कक्षा करिता , आणि इतर काही सुविधांचा अभाव असल्यास शासकीय दरबारी मागणी करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले,
यावेळी श्रीमती सविता पाटील, विवेक मुंज, सत्यवान हुले, प्रकाश चव्हाण, सुनिल वर्दम, जयवंत सोहनी, सुनिल काणेकर, सुनिल सागवेकर, सौ संगीता तायशेट्ये, सौ मंजिरी काणेकर, सौ अनुराधा मांजरेकर, सौ साधना आळवे ( तेली) आदी माजी विद्यार्थी उपस्थितीत होते, ( विद्यामंदिर हायस्कूल १९८१/८२ ) चे
शाळा नंबर ३ चे सर्व शिक्षक , शिक्षिका उपस्थित होते.

You cannot copy content of this page