कुडाळ तालुका नमो चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ..

कुडाळ ता.०५-:

भारतीय जनता पक्ष आयोजित कुडाळ तालुका टेनिस बॉल नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळा राणे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. विजेत्या संघाला ५० हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला २५ हजार रुपये असे आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली असून ५ आणि ६ फेब्रुवारी या दोन दिवसांत या स्पर्धा रंगणार आहेत.
भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस डॉ मंजुषा कुद्रीमोती, प्रदेश सचिव अर्चना देसाई, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, महिला मोर्चा कुडाळ अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, युवा मोर्चा कुडाळ अध्यक्ष रुपेश कानडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पप्या टवते, बाळा राणे, संतोष वालावलकर, ओरोस ग्राम पंचायत सदस्य मानसी नाईक, शक्ती केंद्र प्रमुख अनिस परब, प्रसाद यादव, अरविंद सामंत, शेखर राणे, तुषार पांचाळ, शुभम परब, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page