Headlines

उध्दव ठाकरे वादळ नाही वावटळ…

मातोश्री वरून मंत्रालयात न पोहोचलेली वावटळ दिल्लीत कशी पोहोचणार:भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे ठाकरेंच्या टीकेला चोख उत्तर..

ओरोस ता.०५-:

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उध्दव ठाकरे यांनी टोमणे, अर्धवट माहिती देणारी विधाने, घासून घासून बोथट झालेली वाक्य फेकून जिल्ह्याचे करमणूक करण्याचे काम केले. त्यांचा दौरा म्हणजे वादळ असल्याचे भासविले गेले. परंतु बाळासाहेब असेपर्यंत वादळ होते. आता ठाकरे वादळ नसून वावटळ आहेत. ही वावटळ मातोश्री अथवा मुख्यमंत्री बंगला येथून मंत्रालयात पोहोचू शकली नाही. ती दिल्लीत पोहोचण्याची भाषा करीत आहे, हे हास्यास्पद आहे. या वावटळीला सुद्धा भाजपशी केलेल्या गद्दारीचा वास आहे, अशी खरमरीत टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे.
रविवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि आ नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेवून दिले आहे. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, पप्या टवटे उपस्थित होते.

You cannot copy content of this page