भटवाडी दत्तमंदिर ते गुप्ता दुकानापर्यंत रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०४-: भटवाडी दत्तमंदिर ते गुप्ता दुकानापर्यंत रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन दत्तमंदिरचे पुजारी नंदू अळवणी यांच्या हस्ते करण्यात आले.
हे भूमिपूजन माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, प्रभाग अध्यक्ष रवी नाईक, बूथ अध्यक्ष सचिन साटेलकर या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अनिल कोरगावकर, बंड्या केरकर,बबन डिसोझा,नीलम जोशी, प्रा. शिवाजी पाटील, शशिकला अळवणी, बाळा कावळे,रमाकांत नाईक,प्रवीण ठाकरे, श्री. पुराणिक, सौ. पुराणिक,शंकर नाईक,प्रो. पाटील, पाटील आजोबा, सौ. मेस्त्री, सौ. सावंत, निलम भालेकर, जय भालेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page