सिंधुदुर्ग जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नरसिंह काणेकर यांची निवड…

⚡बांदा ता.०४-: भारतीय जनता पार्टीचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा शामकांत काणेकर यांची भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या शासकीय कंपनीवर भारत सरकार कडून सिंधुदुर्ग जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
श्री काणेकर हे भाजपच्या माध्यमातून येथील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाची भूमिका बजावली आहे. येथील सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत असल्याने त्यांची सल्लागार सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने त्यांचे बांदा शहरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page