⚡बांदा ता.०३-: बांद्याचे माजी सरपंच तथा भाजपचे नेते शांताराम उर्फ बाळा आकेरकर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
श्री आकेरकर हे गेली बरीच वर्षे भाजपात कार्यरत आहेत. ते बांद्याचे माजी सरपंच असून येथील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ओबोसी जिल्हा कार्यकारणीत नियुक्ती देण्यात आली आहे.
भाजप ओबीसी मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदीबाळा आकेरकर नियुक्ती…
