बांदा येथील रस्त्याच्या कामाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡बांदा ता.०३-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डोंगरी विकास निधी मधून मंजूर केलेल्या बांदा येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आज शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. काणेकर यांचे घर ते मराठी केंद्रशाळा या रस्त्यासाठी मंत्री केसरकर यांनी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

या उद्घाटन प्रसंगी बांदा ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, बाळू सावंत, सौ. रुपाली शिरसाट, देवल येडवे, रिया येडवे, विनायक दळवी, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, भाऊ वाळके, राजेश शिरोडकर, पांडुरंग नाटेकर, संदेश पावसकर, परवेज खतीब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page