वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा वाढदिवस उत्साहात…

शिक्षणमंत्री केसरकर यांनी उपस्थिती दर्शवित दिल्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.०१-: वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी वेत्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी काल आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून गाव मर्यादित व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान गावातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा देखील विशेष गौरव करण्यात आला. यावेळी श्री.गावडे यांना उपस्थित कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

You cannot copy content of this page