मळगाव येथे २१ मार्च ला सायकलिंग चे आयोजन

ट्रेल सायकलिंगचा अनुभव घेण्याचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.१९-:* एमटिबी सायकलिंग हा सायकलिंग मधील एक साहसी क्रीडा प्रकार आहे. परंतु हा प्रकार आपणाला फक्त टिव्हीवर किंवा सोशल मीडियावर दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सायकलिंग प्रकारची आवड असणारे अनेक युवक आहेत परंतु या प्रकाराबाबत त्यांना योग्य ती माहिती नाही आहे . त्यामुळे पाॅलिगाॅन सायकल कंपनी व गार्मिन स्पोर्ट जीपीएस वॉच दुचाकी सायकल व पाॅज पावस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २१ मार्च रोजी मळगाव मध्ये सायकलिंग आयोजित करण्यात आली आहे. या मध्ये भाग घेत ट्रेल सायकलिंग चा अनुंभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी मळगाव येथे आठ किलोमीटर चा रस्ता तयार केला असून, कपिल मळगावकर आणि शालेय विद्यार्थी श्रीश नार्वेकर यांनी पुष्कर कशाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोड तयार केला आहे. यासाठी चेतन मळगावकर, डॉ. धीरज सावंत व हरिष नार्वेकर यांचे सहकार्य लाभले आहे. तर कपिल मळगावकर व पुष्कर कशाळीकर यांच्या संकल्पनेतून या क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page