आमदार वैभव नाईक यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी
*💫कुडाळ दि.१९-:* कुडाळ बसस्थानक नवीन इमारत बांधणे व अंतर्गत सुसज्जता करणे यासाठी एस टी मंडळाच्या खात्याचे मंत्री झाल्यावर आपण माझ्या मागणीनुसार आकर्षक बसस्थानक पुर्ण केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचे धन्यवाद मानले आहेत. तसेच अंतर्गत सुविधा लवकर पुर्ण करण्याच्या सुचना संबधित विभागाला देण्यात याव्यात अशी मागणी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज परीवहन मंत्री अनिल परब यांच्या कडे केली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या सह कुडाळ जि प माजी सदस्य संजय भोगटे, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या शिष्टमंडळाने आज आमदार अनिल परब यांची भेट मुंबई येथे घेऊन बलस्थानक बांधण्यासाठी निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच स्थानका परीसर डांबरीकरण, प्रवाशांना निवारा शेड, सभोवताली स्ट्रीट लाईटची सोय, हायमास्ट अशा सुविधा तात्काळ देण्यात याव्यात तसेच परीसरातील धुरळ्यामुळे नागरीक आणि प्रवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे याबाबत संबधीतांना सुचना देऊन कामे जलदगतीने होतील या कडे लक्ष द्यावेत अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सदरची कामे अत्यावश्यक आहेत याची कल्पना आपणांस आहे म्हणून अंतर्गत सुविधांसाठी निधी दिलेला आहे. तरीही दिरंगाई का होत आहे. याचा तात्काळ आढावा घेऊन सर्व कामे मार्गी लागतील यासाठी संबधीतांना सुचना देण्यात येतील असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांना देण्यात आले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आमदार वैभव नाईक हे आपल्या मतदार संघातील कामे अग्रक्रमांने मंजुर करुन घेत असतात अशाही परीस्थित ते जी कामे मागतील ती देण्यासाठी आम्ही कायमच तत्पर आहोत. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
