कणकवली नगरपंचायतला शिवसेनेकडून निधी…

भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी केले स्पष्ट

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली नगरपंचायतला शिवसेनेकडून निधी दिला जातो हे सत्ताधाऱ्यांनी केले मान्य केले.सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी मान्य केल्या बद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानायला हवेत. कारण शहराचा विकास शिवसेनाच करु शकते, हे कामतेकर यांनी स्पष्ट केले. तसेच कणकवली शहराच्या विकासासामध्ये आतापर्यंत स्पोर्ट कॉम्प्लेक्स साठी ४.५ कोटी, नगरोत्थान मधून २ कोटी व आता मिळत नसलेला ३ कोटीचा निधी शिवसेनेच्या माध्यमातूनच आला हे देखील कामतेकर यांनी पालकमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या असलेल्या जुन्या मैत्रीला जागत मान्य करावे. पालकमंत्री उदय सामंत हे आपले जुने मित्र असल्याचे सांगत असलेल्या श्री. कामतेकर यांनी हे जाहीरपणे बोलण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. कारण आमदार नितेश राणे यांचा दबाव झुगारून श्री. कामतेकर यांनी हे केलेले धाडस निश्चितच दखलपात्र आहे. त्यामुळे पालक मंत्र्यांबरोबर ची मैत्री श्री. कामतेकर यांनी अशीच जपावी व त्याचा फायदा आमदार नितेश राणे यांना श्री. कामतेकर यांनी करून द्यावा,असा टोला शेखर राणे यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page