⚡सावंतवाडी,ता.२९: वकील संघटनेच्या माध्यमातून कै. सुहेब डिंगणकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेचा युनायटेड सिंधुदुर्ग संघ विजता ठरला. तर पुणे संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेदरम्यान अॅड. प्रविण काळसेकर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण वकील संघटनेचे अध्यक्ष अँड परिमल नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
वकील संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित क्रिकेट स्पर्धेत “युनायटेड सिंधुदुर्ग” संघाची बाजी…
