⚡सावंतवाडी ता.२९-: शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजनाची बैठक जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी उपनेत्या तथा महिला जिल्हा संघटक सौ जान्हवी ताई सावंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख श्री शैलेशजी परब जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे तालुका प्रमुख रुपेश राऊळ तालुका संघटक मायकल डिसोजा माजी सभापती रमेश गावकर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
यावेळी उप तालुका प्रमुख बाळू मालकर राजू शेटकर संदीप पांढरे आबा सावंत शहर प्रमुख शैलेश गावंढळकर विभागप्रमुख आबा केरकर सुनील गावडे पुरषोत्तम राऊळ नामदेव नाईक फिलिप्स रॉडीक्स गुंडू राऊत विनोद काजरेकर प्रशांत बुगडे संदेश केळकर तसेच तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते..
