ओरोस ता २८-:महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने २९ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संघटनेच्या विविध मागण्यांकडे शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने 29 जानेवारी 2024 रोजी लिपिक वगीय कर्मचा-यांचे पदोन्नतीचे सर कमी करणे व इतर प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार होते. त्याबाबत निवेदन मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना देण्यात आलेले होते. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाची दखल शासनाने घेत 25 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट राज्याध्यक्ष मारुती जाधव व लिपीक हक्क परिषदेचे विभागीय सरचिटणीस दिनकर चव्हाण, सातारा जिल्हापरिषद लिपीकवर्गीय सघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक येवले व सातारा टीमने घेतली. आंदोलनाबाबत मुख्यमंत्री यांना माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री आंदोलनाची दखल घेऊन लिपिक वर्गीय कर्मचा-यांचे प्रश्नाचे संदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले. तसेच ग्रामविकास विभागाने 24 जानेवारी 2024 रोजी पत्र काढून संघटनेचे प्रलंबित प्रश्ना संदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करणेबाबत लेखी कळविले आहे. तसेच धुळे येथे 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष धुळे श्री पाटील यांनी आंदोलनाबाबत व जुनी पेन्शन बाबत निवेदन दिले. त्यावर त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले.
26 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊ जि प लीपकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश महाळुंगेकर व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर आणि सचिन जाधव व कोल्हापूर टीमने निवेदन दिले. त्यांनी लिपिक वर्गीय यांच्या प्रश्नाबाबत अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याबाबत आश्वासन दिले. लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन पुकारले होते. त्याबाबत शासनाकडून लिपिकांचे प्रश्न बाबत योग्य ती दखल घेतलेली असल्याने आणि महाराष्ट्रात सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीचा विचार करता लिपिक वर्गीय संघटनेने आंदोलन करू नये अशी विनंती मुख्यमंत्री यांनी केलेली असल्याने 29 जानेवारी 2024 रोजीचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. 29 जानेवारी 2024 रोजी सर्व जिल्हा परिषदमध्ये सकाळी दहा वाजता गेट सभा घेऊन लिपिक वर्गीय कर्मचा यांना याबाबत माहिती देऊन आंदोलन विसर्जित करण्याचा निर्णय 26 जानेवारी 2024 रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व जिल्हाध्यक्ष यांनी कार्यवाही करावी.
लिपीकवीगीय कर्मचा-यांचे प्रश्नाबाबत शासनाने दखल घेतील असल्याने सर्व जिल्हाध्यक्ष यांनी गेट सभा घेऊन याबाबत लिपीकवर्गीय कर्मचा-यांना अवगत करावे आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पुढील महिनाभरात योग्य तो निर्णय न झाल्यास लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित…
