⚡कणकवली ता.२८-: माऊली मित्र मंडळ , जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सल्लागार, पदाधिकारी,सद्स्य यांनी सुकळवाड, “पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ ” आयोजीत , ४० वर्षेवरील क्रिकेट स्पर्धेला भेट दिली,
यावेळी “श्री भवानी देवी ” जिर्णोद्धार समिती, पाताडेवाडी, अध्यक्ष भाऊ सिताराम पाताडे यांनी माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सल्लागार, सदस्यांचे शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून , श्री भवानी देवी मंदिर, जीर्णोद्धारासाठी सढळ हस्ते मदत केले बद्दल आभार मानले,
याप्रसंगी राजेंद्र पेडणेकर यांनी सुकळवाड ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे, अविनाश गरूड, किशोर पेडणेकर यांचा सल्लागार सुभाष उबाळे, अविनाश गावडे, बाबुराव घाडिगावकर, ज्ञानदेव मोडक, भगवान कासले, प्रभाकर कदम, यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, जय भवानी क्रिकेट संघ सदस्य प्रसाद पाताडे यांचाही माऊली मित्र मंडळाच्यावतीने गौरव करण्यात आला.
यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले,४० वर्षावरील जेष्ठ मंडळींना एकत्रित करून, सातत्याने क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे, हे शिवधनुष्य सुकळवाड, पाताडेवाडी येथील लहानथोर मंडळींनी यशस्वीपणे सलग चौथ्या वर्षी हि त्याच उत्साहाने आयोजित करून, तरूणांच्या समोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे,
याप्रसंगी सुकळवाड पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थितीत होते.
