भैय्या सामंत: रुपेश पावसकर यांच्या भेटी दरम्यान दिली ग्वाही..
⚡कुडाळ ता.२८-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी प.पू.राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांचे प्रश्न,घोडगे सोनावडे घाट रस्ता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मागण्या,नेरूर ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रभाकर गावडे यांचे विकास कामांचे निवेदन,जिल्ह्यातील मोबाईल टॉवरची मागणी, घोडगे सनवडे घाट रस्ता,सिंधुरत्न योजने विषयी चर्चा अशा विविध मागण्या यावेळी श्री.रुपेश पावसकर यांनी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडे केल्या.
श्री.किरण उर्फ भैय्या सामंत साहेब यांनी या मागण्या आपण पूर्ण करू असे आश्वासन दिले.
