वरवडे येथील दिगंबर (आप्पा) सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.२८-: कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथील रहिवासी दिगंबर सदाशिव उर्फ आप्पा सावंत (८०) यांचे शनिवारी रात्री १२.१५ हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.


आप्पा सावंत हे गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती ते शेवटपर्यंत अंगीकारून होते. समाजातील चुकांवर ते सातत्याने बोलत असत कणकवली तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आप्पा सावंत यांच्या बद्दल भीती आणि दरारा होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते निकटचे कार्यकर्ते होते. राणे कुटुंबीयाशी त्यांचे चांगले संबंध होते. आप्पा या नावाने ते परिचित होते. कणकवली तालुक्यात आप्पा सावंत हे सर्वांना परिचित असलेले व्यक्तिमत्व होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page