वृंदा कांबळी:विद्यार्थ्यांच्या वाचन समृद्धीसाठी शाळेद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे केले कौतुक..
⚡वेंगुर्ला ता.२३-: विविध संबोध आणि संकल्पना मुलं आपल्या मातृभाषेतूनच सर्वात जास्त समजून घेत असतात. त्याला व्यक्त व्हायलाही मातृभाषेएव्हढं सोप माध्यम नाही. त्यामुळे मातृभाषेतूनच मुलांचे शिक्षण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासून स्व-विकासासाठी याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका कथाकार वृंदा कांबळी यांनी केले.
मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून अणसूरपाल हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला‘ या उपक्रमांतर्गत वृंदा कांबळी यांना निमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन समृद्धीसाठी शाळेद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे संजय पाटील, सौ.पाटील, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका चारूता परब, सुधीर पालकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
