मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचा मेळावा

युवक काँग्रेसचे आयोजन जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांची माहिती

*💫मालवण दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. चरणसिंग सप्रा यांची मुंबई काँग्रेस कार्यलय येथे भेट घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकी बाबत झालेल्या चर्चेत काँग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईस्थित चाकरमान्यांचे पाठबळ मिळावे यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने चाकरमान्यांचा मेळावा घेण्यात येईल असे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी सांगितले. या भेटीत मुंबई महानगरपालिका निवडणूक बाबत चर्चा झाली. मुंबईत असणारे तळकोकणातील चाकरमानी यांची संख्या उपनगरात मुलुंड, भांडुप कांजूर, विक्रोळी, दहिसर, बोरिवली या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण मतदारसंघातील चाकरमान्यांची संख्या चांगली असल्याने यांची मदत येत्या महानगरपालिका निवडणूक मध्ये काँग्रेस पक्षाला नक्कीच करून घेता यावी यासाठी खारीचा वाटा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने घेऊ असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच या चाकरमानी बांधवांचा मेळावा देखील मुंबईत घेऊ असे यावेळी चर्चे दरम्यान युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी सांगितले. दरम्यान तुम्ही सर्वजण मुंबईत या व अध्यक्ष भाई जगताप यांनी दिलेला स्व:बळाचा नारा यानुसार सर्वांनी मिळून मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवूया असे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सांगितल्याची माहिती मोंडकर यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सुरभी द्विवेदी, एन.एस.यु.आई. मुंबई अध्यक्ष प्रद्युम यादव, ईशान्य मुंबई जिल्हा युवकचे सचिव रुषाल पाटील, युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवक्ता अरविंद मोंडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page