डिंगणे वासीयांनी कडशी नदीवरील काम रोखले

*💫बांदा दि.१८-:* आडाळी येथील एमआयडीसीच्या पाणी व्यवस्थापनासाठी आडाळी येथील कडशी नदीपात्रात केलेल्या खोदकामामुळे डिंगणे व डोंगरपाल या गावांच्या नळपाणी योजना प्रभावित झाल्या असून, नदीपात्रात केलेल्या खोदाईमुळे पात्रातील पाण्याची पातळी सुद्धा घडली आहे. त्यामुळे भविष्यात शेती बागायतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत व ग्रामस्थांनी सदरील काम रोखले. जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री या समस्येकडे लक्ष घालत नाहीत तोपर्यंत काम होऊन देणार नसल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांसनच्या वतीने देण्यात आला. या नंतर सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्गचे तहसीलदार अरुण खानोलकर याना लेखी निवेदन सादर केले. शासनाला ग्रामस्थांच्या समस्येबाबत विचारविनिमय करण्यासाठी विनंती केली. यावेळी डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, मानसे अध्यक्ष व ग्रा. पं. सदस्य आदेश सावंत, राजेंद्र सावंत, शिवराम सावंत, एकनाथ सावंत, विनोद सावंत अंकुश सावंत, डोंगरपाल जेष्ठ ग्रामस्थ श्रीधर परब, विश्वनाथ गवस, गणपत गवस, पिंटो गवस, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page