सिंधुदुर्गनगरी दि.१८ सिंधुदुर्ग या कार्यालयाची दुचाकी वाहनांसाठी MH 07 AP ही नवीन मालिका दिनांक 23 मार्च 2021 पासून सुरु होणार आहे. ज्या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे. त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी दिनांक 23 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत वरिष्ठ लिपीक खाजगी वाहन विभाग यांचेकडे आकर्षक क्रमांक आरक्षित करावायाचा अर्ज आधार, कार्ड व पॅन कार्डचे प्रतीसह सादर करावा. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यत कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी ज्यादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात दिनांक 24 मार्च 2021 राजी वरिष्ठ लिपिक,खाजगी वाहन विभाग यांचेकडे दुपारी 2.00 वाजेपर्यत सादर करावा. धनाकर्षे व अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकाचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या दालनात दिनांक 24 मार्च 2021 राजी दुपारी 3.00 वाजता होईल यांची नोंद घ्यावी. अशी माहिती राजेद्र सावंत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.
वाहनांसाठी नवीन मालिका 23 मार्च राजी सुरु
