नळ पाणी योजनेचे काम त्वरित सुरू करा…

बबन साळगावकर: अन्यथा पालिकेवर धडक..

⚡सावंतवाडी ता.१९-: राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सावंतवाडी नगर परिषदेला ५७ कोटी रुपयांची नळ पाणी योजना मंजूर होऊन सुमारे आठ महिने झाले. मात्र टेंडर होऊन तीन महिने होऊनही केवळ उदघाटनासाठी नळ पाणी योजनेचे काम रखडून ठेवण्यात आले आहे, हे सावंतवाडीच्या शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे,सदर नळ पाणी योजनेचे काम त्वरित सुरू करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

ही योजना वेळेत सुरू झाली असती तर खोदाई करण्यात आलेले रस्ते वेळेत पूर्णही झाले असते. काही रस्त्यांचे डांबरीकरण मंजूर आहे त्या रस्त्यातील पाईपलाईन अगोदर घालून नंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे नाहीतर नेहमीच उलटी गंगा सुरू असते. रस्ते करायचे आणि पुन्हा फोडायचे असं व्हायला नको म्हणून विशेष सूचना मुख्याधिकारी यांना करत आहे खुदाईच्यानंतरच हे डांबरीकरण करता येणार आहे सदर सदर नळ पाणी योजनेचे काम त्वरित सुरू न झाल्यास नगरपरिषेकला धडक देण्याचा इशारा साळगावकर यांनी दिला.

You cannot copy content of this page