अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन..
⚡कणकवली ता.१९-:
कणकवली येथील अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने ‘एआरएम चषक २०२४’ या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली,टेंबवाडी येथील मैदानावर १९ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘कबड्डीचा महासंग्राम’ रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.या उदघाटन सोहळ्याच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
स्पर्धेतील पुरुष गट प्रथम पारितोषिक रोख रुपये २५००४ व चषक,द्वितीय पारितोषिक रोख रुपये १५००४ व चषक, तृतीय पारितोषिक रोख रुपये ५००४ व चषक,चतुर्थ पारितोषिक रोख रुपये ५००४ व चषक, अष्टपैलू खेळाडू रोख रुपये १५०० व चषक,उत्कृष्ट पकड रोख रुपये १००० व चषक,उत्कृष्ट चढाई रोख रुपये १००० व चषक ,शिस्तबध्द संघ रुपये २००० व चषक अशी पारितोषिके आहेत. महिला गट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये ७००४ व चषक,द्वितीय पारितोषिक रोख रुपये ५००४ व चषक, तृतीय पारितोषिक रुपये ३००४ व चषक ,चतुर्थ पारितोषिक रुपये ३००४ व चषक, अष्टपैलू खेळाडू रोख रुपये १००४ व चषक,उत्कृष्ट पकड रोख रुपये ७०४ व चषक, उत्कृष्ट चढाई रोख रुपये ७०४ व चषक, शिस्तबध्द संघ रोख रुपये १००४ व चषक देण्यात येणार आहे.या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
