नवीन १८ रुग्ण:तिघांची कोरोनावर मात
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 284 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 18 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर तीन रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. वैभववाडी तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. त्याला मधुमेहाचा आजार होता. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु संख्या १७८ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
