*💫मालवण दि.१८-:* अष्टपैलू कलनिकेतन मालवण या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे स्व. राम गणेश गडकरी स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. दत्तमंदिर, भरड मालवण येथे घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा १० ते १४ वर्षांपर्यंतचा वयोगट, १५ ते २० वर्षे वयोगट, आणि २१ वर्षावरील खुला वयोगट अशा तीन गटात घेण्यात येणार असून अंतिम स्पर्धेचे स्पर्धक निवड चाचणीतून निवडण्यात येणार आहेत. १० वर्षे वयोगटासाठी निवड चाचणी होणार नाही. सर्व गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना व दोन उत्तेजनार्थ क्रमांकाना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात येणार असून इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे ३१ मार्च पर्यंत सौ.कौशिकी काजरेकर, (9082536844)श्री भालचंद्र केळुसकर ( 9422964132) येथे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा…
