*कारवाई न थांबल्यास मनसे स्टाईल देणार आरटीओ कार्यालयास धडक

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा*

*💫कुडाळ दि.१८-:* करोडपती सिलिका मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहणारे केबिनेट मंत्री मेटाकुटीला आलेल्या डंपर व मालवाहू स्थानिक व्यवसायिकांच्या पाठीशी राहतील का ? असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. आपला चरितार्थ चालवणाऱ्या डंपर व मालवाहक व्यवसायिकांवर सिंधुदुर्ग आरटीओ परजिल्ह्यातील भरारी पथके नेमून नक्की काय साध्य करू पाहत आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी भरारी पथकाद्वारे होणारी कारवाई न थांबल्यास मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयावर मनसे स्टाईल धडक देऊ असा इशारा कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page