त्या आत्महत्या प्रकरणात उपस्थित वाहतूक पोलिसांची चौकशी करा

*मनसेची निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांकडे मागणी*

*💫सावंतवाडी दि.१८-:* सातोळी येथे अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपस्थित असताना सातारा येथील चालक अक्षय बापू हंगे या युवकांनी केलेल्या आत्महत्येबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. अपघात झाल्यानंतर जास्त नुकसान भरपाईची मागणी केल्याच्या निराशेतून त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी करत वाहतूक पोलिसांनी देखील पैसे मागितले असल्याचा आरोप त्यानी केला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी कोण वाहतूक पोलीस होते याची तपासणी करावी. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी मनसे कडून करण्यात आली आहे. तसेच ही आत्महत्या होती की घातपात याचा शोध घेऊन तेथे उपस्थित असणाऱ्या वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांनकडे मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे. यावेळी अँड. राजू कासकर, संतोष भैरवकर, अँड. अनिल केसरकर, सुधीर राऊळ, आशिष सुभेदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page