आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
*💫कणकवली दि.१८-:* सचिन वाझे ला नोकरीत रिइस्टेट करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दबाव टाकला होता. वाझे हा लादेन आहे का ? असे विधिमंडळात विचारत मुख्यमंत्री ठाकरेंनी वाझेला पाठीशी घातले. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच वाझे चे गॉडफादर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.वाझेवर ठाकरेंचा राजकीय वरदहस्त असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. सचिन वाझे , परमवीर सिंग ही छोटी प्यादी आहेत. जर आंबानिंच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा फक्त पब्लिसिटी स्टंट असेल तर हा पब्लिसिटी स्टंट कोणाच्या सांगण्यावरून केला ? याचेही उत्तर एनआयए च्या तपासात येऊन यामागचा असली मास्टरमाइंड उघड होईल असे राणे म्हणाले.
