सिंधुदुर्गातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनात मनसे सहभागी होणार : सुधीर राऊळ…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रश्नी शुक्रवार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटना करत असलेल्या आंदोलनात मनसे सहभागी होणार आहे, अशी माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी दिली.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बरेच वर्ष रखडलेले आहे. ते लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी रेल्वे स्थानकात सिंधुदुर्गातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटना प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्या पासुन आंदोलन छेडणार आहे. लवकरात लवकर टर्मिनस च काम चालू करून सर्व गाड्यांना थांबा द्यावा आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा सिंधुदुर्गातील जनते व प्रवाशी संघटने बरोबर मनसेही तीव्र आंदोलन करणार, असे राऊळ यांनी सांगितले.

You cannot copy content of this page