सावंतवाडी येथे २८ रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबीर…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१६-: येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत २८ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेत येथील माठेवाडा आत्मेश्वर मंदिर नजीक मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात विविध आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर- ९४२२४३५७६०, दिनेश डावरे- ९७६३४१७४७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page