भाजप भटके मिमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नवलराज काळे…

पूर्ण कार्यकारिणी केली जाहीर:लवकरच भाजपचा मोठा मेळावा; प्रभाकर सावंत..

ओरोस ता १६-:भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी तसेच मंडळ अध्यक्ष याची घोषणा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केली. या जाहीर करण्यात आलेल्या नवीन कार्यकारणी मध्ये चार उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, तीन चिटणीस, एक खजिनदार यासह 17 जणांचा समावेश आहे
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा भाजपच्या कार्यालयात भाजपचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन कार्यकारणीची घोषणा जिल्हाध्यक्ष काळे यांनी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी, सरचिटणीस दीपक खरात यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष काळे यांनी, 11 जानेवारी रोजी नवीन कार्यकारणी संदर्भात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षाचे सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकारणीत तसेच मंडळ अध्यक्ष या पदावर संधी देण्यात आली आहे. त्याची आज घोषणा करीत असल्याचे सांगितले.
जाहीर करण्यात आलेल्या नवीन कार्यकारणीत नवलराज काळे यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली असून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जिल्हा प्रभारी शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सुरेश झोरे, मारुती मोहिते, भरत गोरे यांनाही उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून दीपक खरात, जिल्हा संघटक सरचिटणीस म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा चिटणीस म्हणून रवींद्र चव्हाण, विजय जंगले, सुशील खरात यांना संधी देण्यात आली असून खजिनदारपदी महेश जंगले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख संघटक म्हणून परशुराम कार्लेकर, जिल्हा मीडिया प्रमुख म्हणून दर्शन गोसावी, जिल्हा उपमिडिया प्रमुख म्हणून देवराज पाटील, राजू इंगळे यांची तर जिल्हा सल्लागार म्हणून अंबाजी हुंबे आणि कायदेशीर सल्लागार म्हणून एडवोकेट पूजा जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा तालुका मंडळ अध्यक्ष निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या. जिल्ह्यात 14 मंडळ असून यातील कुडाळ मंडळ आणि बांदा मंडळ ही दोन मंडळे रिक्त राहिली आहेत. तर वैभववाडी मंडळ अध्यक्ष म्हणून गंगाराम अडुळकर, कणकवली शहराध्यक्ष म्हणून मरप्पा इंगळे, कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष म्हणून संदीप होळकर, देवगड मंडळ अध्यक्ष म्हणून संतोष साळस्कर, पडेल मंडळ अध्यक्ष म्हणून रामचंद्र उर्फ बाळू कोकरे, मालवण शहर मंडळाध्यक्ष म्हणून अशोक मोहिते, मालवण ग्रामीण मंडळ अध्यक्ष म्हणून संजय शिंगाडे, ओरोस मंडळाध्यक्ष म्हणून लक्ष्मण खरात, याने वेंगुर्ले मंडळाध्यक्ष म्हणून मनीष कोळेकर, दोडामार्ग मंडळ अध्यक्ष म्हणून सखाराम जंगले, सावंतवाडी मंडळाध्यक्ष म्हणून गणेश जाधव आणि आंबोली मंडळाध्यक्ष म्हणून दीपक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

चौकट
भाजपच्यावतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या वतीने अभियान राबविण्यात येत असून भटके विमुक्त जातीतील समाजाला आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, उज्वला गॅस आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. या अभियानाच्या जिल्हा समन्वयक पदी नवलराज काळे यांची निवड करण्यात आली असून उप संयोजक म्हणून बाळा गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली मतदारसंघाच्या समन्वयपदी संदीप गोसावी, मरप्पा इंगळे. कुडाळ मालवण मतदार संघाच्या समन्वयकपदी सुरेश झोरे तर सावंतवाडी मतदारसंघाच्या समन्वयक पदी भरत गोरे यांचे निवड करण्यात आली आहे.

चौकट
यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपाचे सात मोर्चा आणि 28 आघाड्या अशी विविध अंगे आहेत. यातील 25 आघाडीच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व आघाड्यांचा आपल्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने सर्व बांधणी सुरू आहे, असे यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page